मान्सून केरळमध्ये डेरेदाखल, लवकरच महाराष्ट्रातही वर्दी देणार

Continues below advertisement
ज्याची तुम्ही आम्ही चातकाप्रमाणं आतुरतेनं वाट पाहत होतो, तो मान्सूनराजा देशाच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला. हवामान विभागानं याची अधिकृत घोषणा केली आहे.

केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनचे सगळे निकष पडताळल्यानंतर हवामान विभागानं मान्सून आल्याचं जाहीर केलं.

गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने आधीच मान्सून आल्याचं जाहीर केलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram