मुंबई : मोहम्मद शमी-हसीन जहांच्या वादाला नवं वळण, मॅरेज सर्टिफिकेट उजेडात

Continues below advertisement
भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां या दोघांशी संबंधित वादासंदर्भात एक मोठी घडामोड समोर येतेय... हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट उजेडात आलंय... यात हसीन जहांने स्वत:ला अविवाहित सांगितल्याचं निष्पन्न झालंय... 7 एप्रिल 2014 रोजी मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांचं लग्न झालं होतं... दरम्यान शमी ने काही दिवसांपूर्वीच हसीन जहांन पहिलं लग्न आणि तिच्या दोन मुलींबद्दल आपल्याला काहीच सांगितलं नसल्याचा गौप्यस्फोट केला होता... त्यावर शमीला आपण घटस्फोटित असल्याची आधीपासूनच माहिती होती, असा दावा हसीननं केला होता. मात्र लग्नाच्या नोंदणीवेळी हसीननं स्वतःला अविवाहित दाखवल्याचं आता पुढे आलं आहे.
शमीच्या पत्नीनं शमीचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप केल्यापासून हे प्रकरण तापलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram