माथेरान : गर्भवती पत्नीला पतीने माथेरानच्या 800 फूट खोल दरीत ढकललं, पत्नीची सुखरुप सुटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2018 10:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माथेरानच्या दरीमध्ये फेकलेल्या गरोदर महिलेला वाचवण्यात पोलीस आणि गिर्यारोहकांच्या पथकाला यश आलं आहे. तर पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
काल संध्याकाळी सुरेश पवार आणि विजया पवार हे दाम्पत्य आपल्या मुलासह माथेरानला फिरायला आलं... सुरेश आणि विजया यांचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता... पण विजयापासून सुटका मिळवण्याच्या उद्देशाने सुरेशने कड्यावरच्या गणपती पॉईंटपासून तिला 800 फूट खोल दरीत फेकून दिले...
याची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली... तेव्हा पोलिसांनी सह्याद्री मित्र रेस्क्यू टीमच्या मदतीनं शोध मोहीम सुरु केली... आश्चर्य म्हणजे इतक्या उंचावरून पडूनही महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात आलं...
दरम्यान महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे..