बीड : गोदावरीत उडी मारलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू, मराठा क्रांती मोर्चाची संतप्त प्रतिक्रिया
Continues below advertisement
गोदावरी नदीत उडी मारलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. काकासाहेब शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक तरूणांनी गोदावरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना थोपवून धरलं. काकासाहेब शिंदे तरुणानं नदीत उडी घेतली आणि तो बुडाला. काही वेळानंतर त्याला नदीबाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षाव्यवस्था प्रशासनाकडून केली नसल्याचं देखील समोर आलं आहे. आंदोलक काकासाहेब याच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान आंदोलकांनी घटनास्थळीच रास्तारोको सुरु केला आहे. आंदोलकांनी औरंगाबाद-नगर रस्ता रोखून धरला आहे.
Continues below advertisement