Lakme Fashion Week 2019 Finale | करीना कपूरने लॅक्मे फॅशन वीकचा ग्रॅण्ड फिनाले गाजवला | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2019 10:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लॅक्मे फॅशन वीकचा ग्रँड फिनाले अभिनेत्री करिना कपूर खाननं पुन्हा गाजवला. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये करिनानं उपस्थितांची मनं जिंकली. तर लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी करिनासोबतच बॉलिवूडमधल्या इतर अभिनेत्रींचाही बोलबाला पाहायला मिळाला. डिझायनर दिया राजवीरसाठी मलायका अरोरानं रॅम्प वॉक केला. डिझायनर दिशा पाटीलसाठी अभिनेत्री कंगना रनौत, पुनीत बलानीसाठी शिल्पा शेट्टी, सरोज जालानसाठी जेनेलिया देशमुखनं शोस्टॉपर म्हणून रॅम्पवॉक केला. तर अभिनेत्री श्रिय़ा पिळगावकर आणि रितेश देशुमखही लॅक्मेच्या शेवटच्या दिवशी रॅम्पवर उतरला. तर, डिझायनर मासूमी मेवावालासाठी उर्वशी रौतेला, क्राफ्ड कॉरिडोरसाठी अभिनेत्री नेहा शर्मा तर, कावेरीसाठी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी रॅम्पवर उतरली. बॉलिवूडच्या या देखण्या अभिनेत्रींनी लॅक्मेच्या फॅशनवीकमध्ये आपली मोहोर उमटवली. तर इशा देओलची मुलगी राध्या तख्तानीनंही लॅकमे फॅशन वीकमध्ये पदार्पण केलं.