रत्नागिरी : लाडघरच्या समुद्रकिनारी दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2017 09:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लाडघर समुद्रकिनारी दुर्मिळ अशा ऑक्टोपस या सागरी जीवाचं दर्शन घडलं. यापूर्वी लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपस कधीही आढळल्याची नोंद नाही. लाडघर समुद्रकिनारी डॉल्फीन माशांचे अधुनमधून दर्शन घडत असते. त्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची अधिक पसंती आहे. मात्र, या डॉल्फिनबरोबर अन्य दुर्मिळ सागरी जीवांचेही दर्शन घडू लागल्याने लाडघर समुद्रकिनाऱ्याला पर्यटनाचा वेगळाच साज चढला आहे.