Babul Supriyo | भाजप नेते बाबुल सुप्रियोंना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मतदान करण्यापासून रोखले | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2019 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गायक बाबुल सुप्रियो यांच्यात आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या बाबुल सुप्रियो यांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तोडफोड केली होती.