कोल्हापूर : दाट धुक्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक मंदावली
Continues below advertisement
कोल्हापूर शहरात आज सकाळी दाट धुकं पसरलेलं पाहायला मिळालं. सकाळी ६ वाजता शहरातील रस्ते दाट धुक्यात जणू लुप्त झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून वाहनचालकांनी दिवे लावून वाहन चालवणं पसंत केलं. सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातल्या मुख्य रस्त्यांवर ही परिस्थिती होती.
Continues below advertisement