कोल्हापूर : मिनी बस पंचगंगा नदीत कोसळली, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jan 2018 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर: शिवाजी पुलावरुन मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आहेत. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मृतांमध्ये 16 वर्षाखालील 7 मुला मुलींचा समावेश आहे, तर तीन स्त्रीयांची प्रकृती गंभीर आहे.