'निपाह' विषाणूबद्दल सगळी माहिती जाणून घ्या!

Continues below advertisement
निपाह नावाच्या विषाणूनं भारतात चांगलीच खळबळ माजवली आहे. या विषाणूमुळं केरळमध्ये आतापर्यंत 6 जण दगावले आहेत. महाराष्ट्रात या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभागानं मुंबईत तातडीची बैठक बोलावून खबरदारीचे निर्देश दिले आहेत. हा विषाणू इतका भयानक आहे की याच्या संपर्कात येणाऱ्या 70 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. वटवाघुळाच्या लाळेमध्ये हा विषाणू आढळतो. सध्या डॉक्टरांकडून खजुरासह  जमिनीवर पडलेली फळ खाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये या विषाणूनं बाधित पहिला रुग्ण आढळला. महत्वाची बाब म्हणजे या विषाणूवर आतापर्यंत इलाज नसल्याचं कळतंय. त्यामुळं रुग्णांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळतं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram