Kisan Long March : मोर्चेकऱ्यांना परत जाण्यासाठी मुंबईहून विशेष रेल्वेची सोय

Continues below advertisement
शेतकऱ्यांना मुंबईहून परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे देण्यात आली आहे. सीएसएमटीहून भुसावळसाठी दोन गाड्या सोडण्यात येतील. यातील पहिली रेल्वे 8.50 वाजता असेल, तर दुसरी रेल्वे 10 वाजता सुटणार आहे.

एसटी महामंडळानेही शेतकऱ्यांसाठी विशेष बसची सोय केली आहे. आझाद मैदानाजवळ आता एसटीच्या 15 बसेस उभ्या आहेत. त्यापैकी दोन बसेस आंदोलकानी आरक्षित केल्या आहेत. गरज पडल्यास अजून बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. शिवाय कसारा स्टेशनजवळ अतिरिक्त 15 बसेस उभ्या केल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram