मुंबई : सिग्नल यंत्रणा सुधारण्यासाठी मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द
Continues below advertisement
मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे.
सिग्नल यंत्रणेतील सुधारणा आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळ्यादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.