मुंबईतील सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्याला आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2018 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील आगीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. कमला मिल अग्नितांडवाची घटना ताजी असताना आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई सत्र न्यायालय परिसरात आग लागली. मुंबई सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.