Raj Kundra pornography case : Shilpa Shetty शिल्पा शेट्टीच्या हातून बडे ब्रँड निसटणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॉर्न फिल्म प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झालीय. या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठसह तीन निर्मात्यांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉलिवूडमध्ये आणि वेबसीरिजमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून पीडितेचा पॉर्न व्हिडीओ बनवण्यात आले. त्यानंतर राज कुंद्राच्या हॉटशॉटवर हे पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे या प्रकरणीि १२० पॉर्न व्हिडीओ सापडलेत. पॉर्न फिल्म्स तयार करण्यासाठी खोटे प्रोड्युसर बनवले होते..आणि त्यात राज कुंद्राचा पैसा होता, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामुळे कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. शिल्पाच्या हाती असलेल्या ब्रँड्सवर परिणाम होण्याची भीती आहे. अनेक ब्रँड शिल्पाच्या हातून निसटल्याचंही बोललं जातंय..