Kangana Ranau | कंगना रनौत आणि बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
18 Nov 2020 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.