Allu Arjun Arrested : पुष्पा 2 प्रिमियरला चेंगराचेंगरी, चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

Continues below advertisement

Allu Arjun Arrested : पुष्पा 2 प्रिमियरला चेंगराचेंगरी, चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

Pushpa 2 The Rise Stampede in Hyderabad : दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हैदराबादेत झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आहे. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता. आज त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबाद येथील चेंगराचेंगरी प्रकरणी अटक केल्याची माहिती आहे. अल्लू अर्जूनचा पुष्पा 2 चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रीमियरला अल्लू अर्जूनने हजेरी लावली. 'पुष्पा' अल्लू येणार म्हणून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram