Afghanistan Saumya Tondon : 'भाभाजी घर पर है' ची अनीता भाभी सांगतेय अफगाणिस्तान काबूलचा अनुभव

Mumbai : प्रसिद्ध हिंदी मालिका भाभाजी घर पर है याची मुख्य अभिनेत्री सौम्या टंडन हिने 2008 साली अफगाणिस्तानच्या एका मालिकेत काम केलं होतं. यात तिने डॉक्टरची भूमिका केली होती. अफगाणिस्तानची तेव्हाची परिस्थिती कशी होती, काबूलमध्ये शूटिंगचा अनुभव, त्यादरम्यान आलेल्या अडचणी, असा सर्व गोष्टींचा अनुभव तिने एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबानने शिरकाव केल्यानंतर परिस्थिती आणखी अवघड बनत चालली आहे. संपुर्ण व्यवस्थाच कोलमडून गेल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच विषयाला अनुसरून खास अफगाणिस्तानशी कनेक्शन असलेल्या 'भाभाजी घर पर है' ची अनीता भाभी म्हणजेच सौम्या टंडन यांच्याशी 'एबीपी'ने बातचित केली. दरम्यान, अफगाणिस्तानच्या अनुभवाचे वेगवेगळे कंगोरे अनीता भाभीने या निमित्ताने उलगडून सांगितले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola