Maharashtra Local Body Election Voting : मुंबई वगळता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आज मतदान, एक कोटी मतदार निवडणार 6304 प्रतिनिधी!

Maharashtra Local Body Election Voting : मुंबई वगळता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आज मतदान, एक कोटी मतदार निवडणार 6304 प्रतिनिधी!

राज्यातील २६२ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झालीये...तर संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे...गेला महिनाभर सगळ्याच राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला... कुठे युती तर कुठे आघाडीचं चित्र पहायला मिळालं...मात्र आज मतदान करण्यासाठी मतदार राजा सज्ज झाला असून अनेक मत्तबरांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे...तसंच अनेक जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे...

रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू 

२ लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदान करणार 

जिलह्यात ४६ उमेदवार नगरध्यक्षपदाच्या रिंगणात 

मतदान केंद्राच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात

लातूर जिल्ह्यातील औसामध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय. मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा या तीन नगर पालिकांसाठी आज मतदान पार पडतंय..

नाशिकमधील भगूर नगरपरिषदेत उमेदवाराचं नाव नसल्याने गोंधळ झाला. यानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता करंजकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

भगूर इथे काही ठिकाणी मतदान यादीत घोळ आहे. मात्र प्रत्येक मतदाराला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी अनिता करंजकर यांनी केली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola