Mahapalika Election Alliance : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, कुणाची? कुणासोबत युती?

Mahapalika Election Alliance : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, कुणाची? कुणासोबत युती?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झालीय. आमदार सना मलिक यांनी आपल्या मतदारसंघातील उमेदवारांना रात्री उशिरा पक्ष कार्यालयात एबी फॉर्मच वाटप केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३६ जणांची पहिली यादी जाहीर झाली असून आज सकाळी ११ वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं चित्र अखेर स्पष्ट झालंय... मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढत होणार आहे.... मुंबईत भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा या आधीच झाली होती.. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही काल पहिली उमेदवार यादी जाहीर करून स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय.. यानंतर स्वबळाची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने आज वंचितसोबत आघाडीची घोषणा केलीये.. दरम्यान आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही ठाकरे बंधूंसोबत युतीची करण्याचं जवळपास निश्चित केलंय.. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आता रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालंय.. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून, संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिकांवर सोपवली आहे. त्यानंतर आता मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याचं समोर आलंय.. यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू, त्यांची बहीण आणि भावाचीची सून यांचा समावेश आहे. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे. नवाब मलिक यांची बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी दिली जाणार आहे. तर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत.. कप्तान मलिक यांचा प्रभाग 168 होता तो आता सध्या महिलांसाठी राखीव झाला आहे.. त्यामुळे कप्तान मलिकांंनी 165 नंबर प्रभागामधून लढण्याचा निर्णय घेतलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola