Election : धुळे आणि नागपूर येथून मतदानाचा आढावा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Updated at:
05 Oct 2021 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.
कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. आज मतदान तर आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.