नवी दिल्ली : देशाचं पहिलं महिला SWAT पथक स्वातंत्र्यदिनाला मोदींच्या सुरक्षेत

Continues below advertisement
देशात पहिल्यांदाच महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस म्हणजेच SWAT कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 36 महिलांचं हे पथक स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर तैनात असेल. तसंच इंडिया गेटवरही महिलांचं SWAT पथक तैनात असेल. सुमारे 15 महिन्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर या पथकाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचा SWAT पथकात समावेश झाला आहे त्या सर्व ईशान्य भारतातील आहेत. देशातील तसंच परदेशातील तज्ज्ञांनी या पथकाला प्रशिक्षण दिलं आहे. या महिला पथकाला बॉम्ब निकामी करणं, इमारतींवर चढणं आणि ओलिसांची सुटका करणं याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या पथकाने कालच (10 ऑगस्ट) आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram