नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Continues below advertisement
न्यायमुर्ती लोया मृत्यूप्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अपेक्स कोर्टानं न्यायमुर्ती लोयांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अवहाल सादर करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारला दिला आहे. न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूचं प्रकरण हे गंभीर आहे अशा शब्दात कोर्टानं राज्य सरकारला खडसावलं आहे. काँग्रेस नेते तहसीन पुनावाला आणि पत्रकार बी. एस. लोने यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्या आहेत.
Continues below advertisement