नवी दिल्ली : अॅट्रॉसिटीसाठी दलितांनी पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण, पाचजणांचा मृत्यू
Continues below advertisement
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली. या बंदला उत्तर भारतात हिंसक वळण मिळालं. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये लोक रस्त्यावर उतरले. विविध ठिकाणी रास्तारोको, रेल रोको आणि निदर्शनं करण्यात आली. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
मध्यप्रदेशात भारत बंदला गालबोट लागलं असून, हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर राजस्थानमधील अलवरमध्ये एक जणाचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी गाड्या आणि दुकानांची मोडतोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. ग्वाल्हेरमधील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बिहार आणि गुजरातमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.