Sunita Jamgade : सुनीता जमगाडेकडून पोलिसांना चौकशीत सहकार्य नाही, आता एनआयए चौकशी करणार
Sunita Jamgade | सुनीता जमगाडेकडून पोलिसांना चौकशीत सहकार्य नाही, आता एनआयए चौकशी करणार
एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनिता ची चौकशी NIA चे अधिकारी ही करणार आहे..
28 मे पासून नागपूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सुनीताने नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान फारसे सहकार्य केले नसल्याची माहिती असून आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत तुरुंगात झाली आहे...
4 मेला नागपुरातून काश्मीर साठी रवाना होऊन 14 मे ला सुनीताने कारगिल जवळून एलओसी क्रॉस केली होती...
पाक व्याप्त काश्मीर मध्ये तिला गिलगिट जवळ जुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटायचे होते..
मात्र, त्या आधीच तिला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडून 18 मे रोजी बीएसएफ च्या हवाली केले होते....
14 मे ला अवघ्या काही तासात सुनिताने एलओसी क्रॉस करत पाक व्याप्त काश्मीर मध्ये प्रवेश केला होता.. यादरम्यान ती तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे ( बर्फात उंचीवरून खाली कोसळून, तसेच तारेच्या कुंपणातून जाताना ) जखमी ही झाली होती...
तपास यंत्रणांना शंका आहे की स्थानिक मदतीशिवाय सुनीता अवघ्या काही तासात एलओसी क्रॉस करून पाक व्याप्त काश्मीरमध्ये एवढ्या आतपर्यंत जाऊ शकत नाही.. तिला काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर कोणी मदत केली याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे...
विशेष म्हणजे आपल्या अल्पवयीन मुलाला कारगिल जवळ सोडूनच सुनीताने एलओसी क्रॉस केली होती... कालच काश्मीरमधील बालकल्याण समिती च्या ताब्यातून संबंधित बालक नागपुरात आपल्या कुटुंबात पोहोचला होता...
---
- LOC ओलांडून पाकिस्थानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी
- सुनिताची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल न्यायालयात हजर केल्यावर प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश एयू मोटे यांनी सुनीताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले
- सुनीता जामगडे पाकिस्तानात धार्मिक नेत्याला भेटायला गेली असल्याची माहिती
- सुनीताच्या नियमित जामिनासाठी दोन दिवसात न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार आहे
- सुनीताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील नसल्याने न्यायालयाने जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील उपलब्ध करून दिला
- या प्रकरणात सुनीताच्या वतीने एडवोकेट प्रशांत परिवार यांनी बाजू मांडली