Sebi bars Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सवर सेबीची मोठी कारवाई
abp majha web team
Updated at:
12 Feb 2022 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेबीनं काल उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सवर मोठी कारवाई केली. अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्स यांना कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास निर्बंध घातले आहेत. याशिवाय अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश शाह यांच्यावरही सेबीनं अशीच कारवाई केलीय. ही कारवाई करताना सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या कोणतीही कंपनी, मध्यस्थ किंवा अशा कंपनीच्या संचालक-प्रवर्तकांशी व्यवहार करण्यास निर्बंध घालण्यात आलेत. निधी जमा करण्याच्या उद्देशानं असे व्यवहार करता येणार नाहीत, असं सेबीच्या १०० पानांच्या अंतरिम आदेशात म्हटलं आहे.