Union Budget 2026 Full : केंद्रीय अर्थसंकल्प सादर, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, काय स्वस्त काय महाग?
Union Budget 2026 Full : केंद्रीय अर्थसंकल्प सादर, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, काय स्वस्त काय महाग?
Nirmala Sitharaman Union Budget 2026 : विकसित भारतासाठी आम्ही वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या, भारतीय अर्थव्यवस्था बळकट केली. सरकारच्या या धोरणांना लोकांनीही पाठिंबा दिला. येत्या काळात आमची सुधारणा एक्सप्रेस ही वेगाने धावेल यात शंका नाही असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं. निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमण यांच्या महत्त्वाच्या घोषणा आम्ही 12 वर्षांपूर्वी आम्ही सत्तेत आलो त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामध्ये आर्थिक स्थैर्य नव्हतं, राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणात होती. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर यायला सुरूवात झाली. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व्हायला सुरूवात झाली. लोकांची क्रयशक्ती वाढवण्यावर आमचा भर राहिला, आर्थिक रचनात्मक सुधारणा आमच्या सरकारने घडवून आणल्या. दारिद्र निर्मुलनाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात आला. आमचे सरकार आयातीवरची निर्भरता कमी करत आहे. New Income Tax Rule : आयकर कायदे आणि कर संकलनाशी महत्त्वाची घोषणा नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. शिक्षण आणि आरोग्यासाठीचा टीसीएस दर कमी करण्यात आला आहे. तो 5% वरून 2% पर्यंत कमी करण्यात येईल. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत - आयटीआर-1 आणि आयटीआर-2 दाखल करणारे 31 जुलैपर्यंत दाखल करू शकतील. ऑडिट नसलेल्या व्यवसाय प्रकरणे आणि ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असेल. मालमत्ता विकणाऱ्या एनआरआयसाठी टीडीएस नियमांमध्ये बदल पूर्वी आवश्यक असलेला टीएएन आता आवश्यक राहणार नाही. अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही. कर्ज नसलेल्या प्राप्ती: 36.5 लाख कोटी निव्वळ कर प्राप्ती: 28.7 लाख कोटी सुधारित रिटर्नसाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. नाममात्र शुल्क भरून सुधारित रिटर्न दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये राजकोषीय तूट (Fiscal Deficit) जीडीपीच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे. हा अंदाज केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये सादर करण्यात आला होता.