Nirmala Sitharaman ON Budget 2026 : परदेश प्रवासावरील करात कपात, TCS दर 2 टक्क्यांपर्यंत कमी करणार
Nirmala Sitharaman ON Budget 2026 : परदेश प्रवासावरील करात कपात, TCS दर 2 टक्क्यांपर्यंत कमी करणार
Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (1 फेब्रुवारी 2026) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2026) मांडला. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर केला. आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचे काम केले. देश गेल्या 12 वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. देशात गुंतवणुक वाढीला लागली आहे. भारताची विकसीत भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय, पाहा संपूर्ण यादी...(What is cheap, what is expensive? Check Full List Budget 2025 Marathi News)
देशाचा आज अर्थसंकल्प मांडण्यात आला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला, इनकम टॅक्समध्ये कोणताही बदल झालेला नसून सर्वसामान्यांना कोणताही दिलासा यावेळी मिळालेला नाही, तर देशात १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे, आणि३१ ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे, यामुळे कर भरणं आता सुटसुटीत होणार आहे, याशिवाय अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज याची घोषणा केलीये...