Nirmala Sitharaman ON Budget 2026 :नवीन आयकर कायदा 1 एप्रिलपासून लागू,अपघात विम्यावरील रक्कम करमुक्त

Nirmala Sitharaman ON Budget 2026 :नवीन आयकर कायदा 1 एप्रिलपासून लागू,अपघात विम्यावरील रक्कम करमुक्त
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. नवा आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, अशी घोषणा केली आहे.  मध्यमवर्ग आणि पगारदारंचं लक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आयकरातील करसवलत वाढवून मिळणार का याकडे होतं. मात्र, निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेनं पाऊल टाकणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं.  12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री केंद्र सरकारनं 2025-26  मध्ये 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत जाहीर जाहीर केली होती. ही कर सवलत यंदा देखील लागू असेल. यामुळं 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आयकर मुक्त आहे.  Tax Slab : 2026 मधील आयकराचे टॅक्स स्लॅब (न्यू टॅक्स रिजीम) 4 लाखांपर्यंत : करमुक्त 4 ते 8  लाख :5 टक्के 8 ते 12 लाख : 10 टक्के 12 ते 16 लाख: 15 टक्के 16 ते  20 लाख : 20 टक्के 20 ते 24 लाख : 25 टक्के 24  लाखांच्या पुढे : 30 टक्के  2026-27  मध्ये ओल्ड टॅक्स रिजीममध्ये किती कर? 2.5 लाख : करमुक्त  2.5 लाख ते 5 लाख : 5 टक्के  5 लाख ते 10 लाख :  20 टक्के  10  लाखांच्यावर : 30 टक्के  2025-26 मधील आयकराचे न्यू टॅक्स रिजीममधील टॅक्स स्लॅब केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार 2025-26 मधील कररचनेचे टॅक्स स्लॅब या प्रकारे होते. नव्या करचनेतील टॅक्स स्लॅबमध्ये  12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं होतं.    4 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं होतं. 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लावण्यात आला होता. 8  लाख ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर द्यावा लागणार होता. याशिवाय 12 लाख ते 16 या दरम्यान टॅक्स स्लॅब 15 टक्के होता. 16 लाख ते 20 लाखांपर्यंत 15 टक्के आयकर निश्चित करण्यात आला होता. 20 ते 24 लाख रुपयांसाठी 25 टक्के आयकर आकारण्यात आला होता. तर, 24 लाखांच्या वरील उत्पन्नासाठी 30 टक्के कर आकारला जात होत होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola