ब्रेकफास्ट न्यूज : International Yoga Day 2018 : देशभरात योग दिनाचा उत्साह

Continues below advertisement
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज देशभरात योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये योगासनं केली. आपल्या ITBP च्या जवनांनी सुद्धा योगदिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिकं सादर केली. ITBP अर्थात इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांनी तब्बल १९ हजार फुटांवर योगाभ्यास केला. रोहतांग आणि लडाख परिसरातल्या ITBP जवानांनी केलेली ही योग प्रात्यक्षिकं आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीत देशाच्या सीमांचं संरक्षण करणाऱ्या य़ा हिमवीरांच्या शौर्याला यानिमित्तानं पुन्हा एकदा सलाम. त्यामुळे आज योग दिनाच्या मुहूर्तावर जमीन, पाणी, बर्फ, आकाशात योगासनं केलीत. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा या भारताच्या मागणीला संयुक्त राष्ट्रानं २०१४मध्ये मान्यता दिली. त्यानंतर २०१५ पासून जगभरात योग दिन साजरा केला जातो. s @9AM : Yoga Day Live @9AM 21:06:2018
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram