भंडारा-गोंदिया: आचारसंहितेच्या काळातही तुडतुडे किडीची मदत, राष्ट्रवादीचा आक्षेप

Continues below advertisement
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजप अडचणीत आलं आहे.  आचारसंहिता सुरु असतानाही काल तुडतुड्या किडीची लागण झालेल्या पिकांची नुकसान भरपाई  देण्याचं काम सुरु होतं.  त्यासाठी काल रात्री चक्क उशिरापर्यंत भंडाऱ्यातील सरकारी ट्रेजरीमध्य़े अधिकारी काम करत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ट्रेजरी डिपार्टमेंटमध्ये शिरुन हे काम बंद पाडलं. माझानं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर ही मदत थांबवण्यात आली. आता 29 मे नंतर मदत दिली जाणार आहे.  हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्य़ांना नुकसान भरपाईची मागणी विरोधकांनी केली होती..त्यावेळी सरकारनं ही मागणी मान्यही केली.  मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि ते ही आचारसंहितेच्या काळात सरकारनं देऊ केलेल्या मदतीमुळे भाजप इथंही अडचणीत आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram