बीड : सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा बंगला तातडीने जमीनदोस्त करा : धनंजय मुंडे

Continues below advertisement
सहकारमंत्री सुभाष देमुख यांनी सोलापुरात महापालिकेच्या आरक्षित जागेवर आलिशान बंगला बांधल्याचा अहवाल आलाय.
त्यानंतर सुभाष देशमुखांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. पण सुभाष देशमुखांसाठी एकही भाजप नेता पुढे आला नाही.
साधी प्रतिक्रियाही कुणी दिली नाही. त्यामुळे अनधिकृत बंगल्याच्या मुद्द्यावरुन सुभाष देशमुख एकटे पडले आहेत.
देशमुखांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्यामुळे आता हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलंय. ज्या प्रमाणं भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंचा राजीनामा स्वीकारला. त्याप्रमाणं आता सुभाष देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का हा प्रश्न आहे.
सोलापूरमधील बंगला बेकायदेशीर असल्याचा स्पष्ट अहवाल पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram