मुंबई : अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा पद सोडणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2018 10:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अॅक्सिस बँके'च्या सीईओ शिखा शर्मा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदावरुन पायउतार होणार आहेत. वर्षअखेरीस आपलं पद सोडण्याचा निर्णय शर्मांनी जाहीर केला आहे. कार्यकाळ अडीच वर्षांनी कमी करण्याची विनंती करत शिखा यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अॅक्सिस बँकेच्या सीईओपदी पुन्हा एकदा शिखा शर्मा यांची नियुक्ती करण्याच्या बोर्डाच्या प्रस्तावावर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.