अंबरनाथ : व्हॉट्सअॅपसाठी अल्पवयीन मुलीचं घरातून पलायन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2018 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हॉट्सअॅप वापरण्यावरुन आई रागावल्याने एक अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या घटनेनं पालकवर्गात मात्र खळबळ उडाली आहे. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलगी फेब्रुवारी महिन्यात मित्रांसोबत पिकनिकला जाऊन आल्यानंतर व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो पाहात बसली होती. याच कारणावरुन तिची आई तिला रागावली. यामुळे निराश झालेली ही मुलगी घरात कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली.