रायगड : नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला आणि कार जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2018 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरुच आहे. नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील किहीम येथील आलिशान बंगला आणि दोन कार सीबीआयने सील केल्या आहेत.
नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनाऱ्यालगत सुमारे 70 गुंठे जागेमध्ये आलिशान बंगला आहे. नीरव मोदीच्या या बंगल्यामध्ये 13 कर्मचारी काम करत होते. मंगळवारी दुपारी नीरव मोदीच्या बंगल्यावर मुंबईच्या सीबीआय पथकाने धाड टाकली.