अहमदाबाद : मी नरेंद्र मोदींची पत्नी, ते माझे राम : जशोदाबेन
Continues below advertisement
आपण नरेंद्र मोदी यांच्या पत्नी असून ते आपले राम आहेत, असं वक्तव्य मोदींपासून विभक्त राहणाऱ्या पत्नी जशोदाबेन यांनी केलं आहे. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याच्या दाव्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरताना मोदींनी विवाहित असल्याचे शपथपत्र देत पत्नीच्या रकान्यात जशोदाबेन यांचा उल्लेख केला होता.
Continues below advertisement