माझा विशेष : विद्यार्थी कोणत्या तणावाला बळी पडत आहेत?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2018 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दादरमध्ये एका दहावीत शिकणाऱ्या मुलाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आज त्याचा दहावी बोर्डाच्या परीक्षचा पहिला पेपर होता. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अभ्यासाच्या ताणामुळे एका 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. अभ्यासक्रम झेपत नाही या क्षुल्लक कारणामुळे खुशी सिंगने आपलं आयुष्य संपवलं. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या खुषीला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे ती इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत थोडी मागे पडू लागली.याच नैराश्यातून तिने गळफास घेतलाय.
धक्कादायक म्हणजे या तणावामुळे त्यांचा जीव जातोय. असं का घडतंय? अजाणतेपणी पालक अपेक्षांचं खूप मोठं ओझं आपल्या पाल्यांवर टाकतात. निकोप स्पर्धा लोप पावली आहे. असं असलं तरीही संवादाअभावी मुलांना ताण तणाव झेपत नाही.