712 वर्धा : कीटकनाशक फवारणीवेळी हेल्मेटचा वापर, विषबाधेवर शेतकऱ्याचा तात्पुरता उपाय

Continues below advertisement
कीटकनाशकाची फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यानं विदर्भात अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. या सगळ्या समस्यांवर वर्धा जिल्ह्यातील वृषल पाटील या शेतकऱ्यानं तात्पुरता उपाय शोधला. फवारणीसाठी मास्क एवजी चक्क हेल्मेटचा वापर केला. यामुळे शेतमजुरही पुन्हा कामावर रुजु झाले आहेत. मात्र हा उपाय कायमचा म्हणता येणार नाही. इतर शेतकऱ्यांनी याचं अनुकरण करु नये, असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येतंय. या समस्येवर फवारणीसाठीच्या कीटचं वाटपच एकमेव उपाय आहे. तरीही तात्पुरता उपाय म्हणून याचा वापर केल्याचं वृषल पाटील सांगत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram