712 : हवमानाचा अंदाज : राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2018 08:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
येत्या ४८ तासात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तसच उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी वेळीच उपाय करण्यासही सांगण्यात आलं आहे. विदर्भ विभागातील हवामान मात्र कोरडं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.