NIA Raid Pune: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India-PFI) या संघटनेच्या पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर NIA, ATS आणि इतरही काही तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत.  या छाप्यात 'PFI'च्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.  त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.  पीएफआयचं महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.


देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे. त्याच अनुषंगाने आज पहाटे पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी दोघांची नावे आहेत. रजी अहमद खान हा पुणे जिल्ह्यातील पीएफआयचा कार्यकर्ता होता. त्याने या आधी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. 


मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे समाजात तेढ वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.