नागपूर : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय द्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप - असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून या अंतर्गत गुरूवारी 1 सप्टेंबर 2022 रोजी पूर्व नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरदार वल्लवभाई पटेल (कच्छीविसा) मैदान, ए.व्ही. लेआउट लकडगंज येथे गुरुवारी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप - असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण नागपुरातील 9018 लाभार्थ्यांना 9.19 कोटी रुपये किंमतीची (अडीप - 854, वयोश्री- 8164) एकूण 68,683 साहित्य, उपकरणे (अडीप- 1731, वयोश्री- 66952) वितरित करण्यात आली. 1 सप्टेंबरला पूर्व नागपुरातील 4549 (अडीप - 590, वयोश्री- 3959) लाभार्थ्यांना एकूण 34130 (अडीप- 1202, वयोश्री- 32928) साहित्य, उपकरणे वितरित करण्यात येणार आहेत. या साहित्याची एकूण किंमत 4.82 कोटी रुपये एवढी आहे.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 27 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील 27,356 वरिष्ठ नागरिक वयोश्री योजनामध्ये तसेच 7780 दिव्यांगजन एडिप योजनामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. एकूण 35136 लाभार्थ्यांना रु 34.83 कोटीचे उपकरण वितरित केले जाणार आहे.
पूर्व नागपुरातील लाभार्थ्यांना साहित्य वितरणाचा शुभारंभ गुरुवारी (1 सप्टेंबर) रेशीमबाग मैदानात सकाळी 10.30 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी केले आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
वॉकिंग स्टिक, श्रवण यंत्र, एल्बो कक्रचेस, व्हीलचेअर, ट्रायपॉड्स, क्वॅडपॉड, कृत्रिम मर्डेचर्स, स्पेक्टल्स, क्वॅकपॉड, स्पेक्टल्स एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
वॉकिंग स्टिक, एल्बो कक्रचेस, एझलरी कक्रचेस (कुबडे), कृत्रिम अवयव, श्रवण यंत्र, ट्रायपॉड्स, क्वैडपोड, व्हीलचेयर, ट्रायसिकल (मॅन्युअल), ट्रायसिकल (बॅटरी), कॅलीपस, TLM कीट, ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता), स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता), डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता), स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता).