सोलापूर : सोलापूर शहरातून एक समाधानकारक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना बााधित रुग्णांची वाढणाऱ्या सोलापुरात आता उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीन आकडी संख्येवर येऊन पोहोचली आहे. सोबतच सोलापूर शहरातील मृत्युदर देखील घटला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर शहरात कोरोनामुळे आज एका ही मृत्यूची नोंद नाही. आज प्राप्त अहवालानुसार सोलापूर शहरात सोमवारी 690 जणांच्या चाचणी करण्यात आल्या. यापैकी 630 जणांचे अहवाल हे नेगेटिव्ह आढळले आहेत. तर 60 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह आढलले आहे. मात्र समाधानाची बाब म्हणजे नवीन मृत्यूची नोंद शहरात नाहीये.


याआधी 6 ऑगस्ट रोजी देखील शहरात एकाचा ही बळी कोरोनामुळे गेला नाही. तसेच रुग्णांच्या डिस्चार्ज होण्याच्या संख्येत चांगली वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या तीन आकडी संख्येवर येऊन पोहोचली आहे. शहरात आतापर्यंत 5520 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 383 रुग्णांचा मृत्यू झाला. तर सोमावारी एका दिवसात 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने शहरातील 4169 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहे. त्यामुळे आता केवळ 968 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 6 दिवसांच्या आकडेवारी लक्षात घेता जवळपास 281 रुग्णांचे अहवाल पॉसिटिव्ह आढळले आहेत तर 14 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र तब्बल 734 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


दरम्यान एककीकडे सोलापूर शहराची परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी ग्रामीण सोलापूरची परिस्थिती मात्र अद्याप चिंताजनक आहे. आज प्राप्त अहवालानुसार सोलापूरच्या ग्रामीण भागात 285 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉसिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 7 जणांचा मृत्यू देखील कोरोनामुळे झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्य़ंत एकूण 6187 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 179 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 228 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आतापर्यंत 3561 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ग्रामीण भागातील 2447 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.


ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण हे बार्शी, पंढरपूर या तालुक्यामध्ये वाढत आहेत. आज आढळलेल्या 285 रुग्णांपैकी 129 रुग्ण हे केवळ पंढरपूर तालुक्यातील आहेत. तर 45 रुग्ण हे बार्शी तालुक्यातील आहेत. तर मृत्यू झालेल्या 7 रुग्णांपैकी बार्शीतल्या 5 जणांनी आपला जीव गमावला आहे.