आपल्या दोन लहान मुलं आणि बायकोचा बळी घेत नितेशकुमार उपाध्याय यांनी स्वतःला देखील आत्महत्या केली. लहान मुलांमध्ये मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. संपुर्ण कुटुंबातील सदस्यांचा जीव गेल्याने शिव कॉर्नर सोसायटी सुन्न झाली आहे. नितेश कुमार गेल्या आठ महिन्यांपूर्वी तळोजा मधील शिव कार्नर सोसायटीत भाड्याने रहायला आले होते. नविन असल्याने त्यांची सोसायटी मधील इतर सदस्यांबरोबर जास्त ओळख झाली नव्हती. डिसेंबर महिन्यापासून घर मालकाला भाडे मिळाले नव्हते. अनेकवेळा उपाध्याय यांना फोन करूनही तो लागत नव्हता. त्यामुळे अखेर घरमालकाने आज सोसायटीत येऊन डुप्लीकेट चावीने घर उघडले आणि हा प्रकार समोर आला.
Dr. Payal Tadvi Suicide Case : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना नायर रुग्णालयाच्या परिसरातील प्रवेश बंदी कायम
घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली -
नवी मुंबई पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला असता सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये आपल्या आत्महत्येस कुणालाही दोषी धरू नये असा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांची फारेन्सीक टीम घटनास्थळी आली असून मृत्यूचे नेमके कारण काय आणि कोणत्या प्रकारे झाले आहेत याचा तपास करीत आहेत. नितेशकुमार उपाध्याय यांचा ऑनलाईन कपडे विकण्याचा व्यावसाय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यापासून अख्ख कुटुंब गायब असल्याची तक्रार कोणीच का केली नाही? घरमालकानेही दोन महिने फोन लागत नसताना तपास का केला नाही? या सर्व गोष्टींचा पोलीस तपास करत आहेत.
National Boxer's Suicide | राष्ट्रीय बॉक्सर प्रणव राऊतची गळफास लावून आत्महत्या