सिंहाचा चिमुकलीवरील हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
यानंतर या दोन ट्रेनरपैकी एक ट्रेनर सिंहाला बाहेर घेऊन जातो, तर दुसरी महिला ट्रेनर चिमुकलीच्या आईची घडल्या प्रकाराबद्दल माफी मागते. Con Sello de Mujer हा महिलांवर आधारित कार्यक्रम होता. 1998 ते 2007 पर्यंत याची लोकप्रियता खूप मोठी होती. या कार्यक्रमात आरोग्य आणि सौंदर्यासारख्या विषयांवर कार्यक्रम होत असत.
यामुळे ती चिमुकलीही आणखीनच घाबरून गोंधळ घालू लागली, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. यानंतर ट्रेनर त्या सिंहाचा जबडा उघडून चिमुकलीची सुटका करू लागले. तर त्या चिमुकलीची आई तिला आपल्याकडे खेचू लागली. मोठ्या परिश्रमानंतर ट्रेनर सिंहाचा जबडा उघडण्यास यशस्वी झाले.
मात्र, जेव्हा त्या चिमुकलीने विव्हळण्यास सुरुवात केली, त्यावेळी तो सिंह सैरभैर झाला, अन् त्याने त्या चिमुकलीवरच झडप घातली. यामध्ये तो आपल्या तीक्ष्ण दातांनी चिमुकलीचा पाय पकडून आपल्याकडे खेचू लागला.
या कार्यक्रमामध्ये दोन ट्रेनर सिंहाची काही प्रात्यक्षिके सादर करत होते. यावेळी हा सिंह अतिशय शांत होता. या कार्यक्रमात एक महिला आपल्या चिमुकलीला कुशीत घेऊन ही सर्व प्रात्यक्षिके आनंदाने पाहात होती.
लाइव्ह टीव्हीच्या एका कार्यक्रमात चिमुकलीवर सिंहाने हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॅक्सिकोतील Con Sello de Mujer या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण 2007 मध्येच बंद करण्यात आले होते. पण सध्या याच शोमधील हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.