सिद्धू 'द कपिल शर्मा शो' सोडणार नाही!
नवज्योतनं आवाज-ए-पंजाब मोर्चाची नुकतीच घोषणा केली होती.
अशीही माहिती आहे की, या शोमधून सिद्धूची कोट्यवधी रुपयांची कमाई होते.
यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत कपिल शर्माचे सगळे शो रिकॉर्ड करुन सिद्धूनं त्याला गुडबाय म्हटलं आहे.
सिद्धूची पत्नी नवज्योत कौर सिद्धूचं म्हणणं आहे की, सिद्धू आता आपलं पूर्ण लक्ष पंजाबच्या राजकारणावर केंद्रीत करणार आहे.
कपिल शोची क्रिएटिव्ह हेड प्रीती सिमोजनं ट्विटरवर ही अफवा असल्याचं सांगितलं. तसेच सिद्धूनं सोनी टीव्ही सोडण्याची कोणतीही नोटीस दिली नसल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळे सिद्धू हा शो सोडणार ही अफवाच होती.
याआधी अशा बातम्या आल्या होत्या की, सिद्धू पंजाबच्या निवडणुकीच्या तयारीसाठी या शोला रामराम करणार आहे.
प्रसिद्ध कॉमेडी शो कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'साठी एक चांगली बातमी आहे. नवज्योत सिंह सिद्धू हा शो सोडणार नाही.