'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांना महेश मांजरेकरांची पार्टी
मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती, तर पुष्कर जोग उपविजेता.
पार्टीमध्ये 'बिग बॉस मराठी' मधील सर्व स्पर्धक भांडण-तंटे विसरुन गुण्या गोविंदाने एकत्र हसता-खिदळताना दिसत आहेत
'बिग बॉस मराठी' मधील स्पर्धक पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होतं मराठी मनोरंजन विश्वाचे 'बिग बॉस' महेश मांजरेकर यांनी आयोजित केलेल्या पार्टीचं
नंदकिशोर चौघुले, त्यागराज खाडिलकर, विनित बोंडे बिग बॉसच्या घरात अल्प काळासाठी झळकलेले चेहरेही पार्टीत दिसले.
पार्टीतील फोटोंमध्ये अनुपस्थिती जाणवली ती अनिल थत्ते, उषा नाडकर्णी, आरती सोळंकी आणि राजेश शृंगारपुरे यांची
बिग बॉसमधील स्पर्धकांसोबत महेश यांच्या पत्नी मेधा मांजरेकर, कलर्स मराठीचे निखिल साने, आस्तादची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री स्वप्नाली पाटीलही पार्टीला हजर होते
मेघा धाडे, पुष्कर जोग, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत आणि ऋतुजा धर्माधिकारी यांचा ग्रुपही पुन्हा भेटला.
नेहमीप्रमाणे आस्ताद काळे, रेशम टिपणीस, सुशांत शेलार, भूषण कडू, जुई गडकरी, स्मिता गोंदकर यांचा गट बऱ्याचशा फोटोंमध्ये एकत्र दिसला.