कपिल शर्माचे जॅकलीन फर्नांडिससोबत लग्न ?
कीकू शारदाने ट्विटरवरून कपिलला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाच्या शूटिंगवेळी कपिल आणि जॅकलीन रोमॅन्सही करताना पाहायला मिळाले.
जॅकलीन आणि कपिलचे लग्नही याचाच एक भाग होता. कपिलच्या या शोच्या आगामी कार्यक्रमावेळी तुम्हाला हे पाहायला मिळेल.
विनोदवीर कपिल शर्माने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सोबत लग्न केले आहे. कपिल शर्माच्या आईनेही नव दाम्पत्यांना आशीर्वाद दिला. यावेळी 'द कपिल शर्मा शो' मधील कपिलचे सहकलाकार सुनिल ग्रोवर आणि कीकू शारदा यांनीही कपिलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
हा सर्व प्रकार कपिलचा 'शो द कपिल शर्मा शो'च्या सेटवर घडला.
बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिज आपला आगामी चित्रपट 'ए फ्लाइंग जट्ट'च्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर पोहोचले होते. यावेळी सर्वच कलाकारांनी खूप मस्ती केली.
तसेच कपिलच्या शोमध्ये डॉक्टरची भूमिका साकारणाऱ्या सुनिल ग्रोवरनेही ट्विट करून कपिलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.