टीव्ही मालिकेतील या व्यक्तीरेखा तुम्ही कधीही विसरणार नाही!
दूरदर्शनवरील सर्वात जास्त लोकप्रिय मालिका 'कुंती' आजही अनेकांना आठवत असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाक्षी तंवर 'कहानी घर घर की' या मालिकेने अनेकांना परिचयाची आहे.
'फ्लॉप शो'चे जसपाल भट्टी आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.
'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेतील 'तुलसी'ची व्यक्तीरेखा आजही अनेकांच्या लक्षात आहे. या एकाच व्यक्तीरेखेमुळे ही मालिका अनेक वर्षे सुरु होती. 'तुलसी'ची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री स्मृती इराणी सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत.
'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेतील जस्सी आणि तिचे दात सर्वात जास्त लोकप्रिय झाले.
2008 मधील 'बालिका वधू' या मालिकेतील आनंदीने अनेकांच्या मनावर राज्य केले.
CID ही मालिकही अनेकांच्या स्मरणात आहे, ती त्यातील अतिरिक्त पोलीस आयुक्ताच्या व्यक्तीरेखेमुळे. या मालिकेतील ACPची भूमिका साकरणारे शिवाजी साटम आजही विविध मालिका आणि चित्रपटातून लोकांचे मनोरंजन करत आहेत.
रविवारी सकाळी 12 वाजता हातातील सर्व कामे सोडून टीव्ही सेटच्या समोर येऊन बसत. या वेळेत त्यांच्या आवडीची 'शक्तीमान' ही मालिका लागत असे. या मालिकेतला मुख्य नायक मुकेश खन्ना आजही तरुणांना शक्तीमानच्या रुपात आठवत असेल.
1933मधील शोधपट मालिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील गुप्तहेर व्योमकेश बक्षी आजही अनेकांना त्यांना याच त्याच व्यक्तीरेखेने परिचित आहे.
टीव्ही मालिकेतील काही व्यक्तीरेखा या अनेकांच्या सदैव लक्षात राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यक्तीरेखांची आठवण करुन देणार आहोत.
'श्रीमान श्रीमती'मधील दिलरुबा आणि केशवची व्यक्तीरेखा आजही अनेकांना आठवत असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -