✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अनिकेत विश्वासराव-स्नेहा चव्हाणच्या लग्नाची क्षणचित्रं

एबीपी माझा वेब टीम   |  12 Dec 2018 02:00 PM (IST)
1

'चॉकलेट हिरो' अशी ओळख असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत पुण्यात अनिकेत विवाहबद्ध झाला.

2

3

स्नेहाने हातावर मेंदीचा साज चढवल्यानंतरचे फोटोही चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

4

स्नेहा चव्हाणने सोनी मराठीवरील महाराष्ट्राचा फेवरिट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. याशिवाय ती हृदयात वाजे समथिंग या मालिकेतही भूमिका करते. स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटात भूमिका केली होती. अनिकेत आणि स्नेहा चव्हाण 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या चित्रपटात एकत्र झळकले होते.

5

अनिकेत विश्वासरावने 'अल्फा मराठी' वाहिनीवरील 'नायक' मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'झी मराठी'वरील 'ऊनपाऊस' मालिकेत त्याने साकारलेली सागरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. तेव्हापासूनच अनिकेत अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला.

6

स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या ओळखीतून दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईतील बोरीवलीमध्ये गेलं.

7

स्नेहाने अनिकेतच्या हळदीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

8

विशेष म्हणजे हे अरेंज मॅरेज आहे. स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा पुण्यातील हिंजवडीमध्ये यावर्षी पाच ऑगस्टला झाला होता. अनिकेत आणि स्नेहाचं लग्न जून महिन्यातच ठरलं होतं.

9

फारसा गाजावाजा न करता पुण्यातील गुलमोहर लॉन्समध्ये अनिकेत-स्नेहाचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि मनोरंजन विश्वातील काही कलाकार उपस्थित होते.

  • मुख्यपृष्ठ
  • Tv_and_theatre
  • बातम्या
  • अनिकेत विश्वासराव-स्नेहा चव्हाणच्या लग्नाची क्षणचित्रं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.