या 14 स्मार्टफोनच्या कॅमेरा पुढे, DSLR कॅमेराही फिका

नूबिया Z11 (किंमत 12,999 रुपये): कमी किमतीच्या पण सर्वोत उपयुक्त अशा स्मार्टफोन सिरीजमध्ये नूबिया Z11 हा स्मार्टफोन छुपा रुस्तम आहे. 12,999 रुपये इतक्या कमी किमतीत सर्वात चांगली कॅमेरा क्वॉलिटी तुम्हाला मिळू शकते. जर या फोनमध्ये 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध असती, तर इतर स्मार्टफोनला मागे टाकून या स्मार्टफोनने बाजी मारली असती, असे मत अनेक टेक्नॉलॉजिस्टचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोटो X प्ले: मोटो X प्ले या स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा कॅमेरा असून, या स्मार्टफोनमध्ये सोनीचा सेन्सर बसवण्यात आला आहे.

शाओमीचा Mi 5 (किंमत 22,999 रुपये): शाओमीच्या Mi 5 या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा असून, याचीही कॅमेरा क्वॉलिटी उत्तम आहे.
आसूस जेनफोन 3 (किंमत 12,788): आसूसच्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा असून, हा स्मार्टफोन सर्वात जलद फोटो कॅप्चर करु शकतो.
ऑनर 8 (किंमत 29,999 रुपये): कमी किमतीच्या पण चांगल्या कॅमेरा क्वॉलिटीमध्ये ऑनरचे स्मार्टफोन उत्तम पर्याय आहेत. ऑनरच्या फ्लॅगशिपमधील ऑनर 8 मध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा असून, याच्या कॅमेरातून क्लिक केलेले फोटो झूम केल्यानंतरही पिक्सलेट होत नाही.
सोनी एक्सपीरिया XZ (किंमत 51,990 रुपये): 5 अॅक्सिस स्टोबिलिटी सिस्टीमसोबतच 4K व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी हा फोन सर्वोत्कृष्ठ आहे. 23 मेगापिक्सेल कॅमेराच्या या स्मार्टफोनमध्ये फोकसिंग सिस्टम चांगली आहे. एक्सपीरीया Z फेस डिटेक्सन आणि लेजर ऑटोफोकस तंत्रज्ञानाने युक्त आहे.
मोटो Z ( किंमत 39,999 रुपये): मोटो Z ची कॅमेरा क्वॉलिटी सर्वोत्कृष्ठ असून, F1.8 अॅपर्चर लेन्समुळे कमी प्रकाशात चांगला फोटो कॅप्चर करता येतो. विशेष म्हणजे, या फोनच्या स्लाईड मोड कॅमेरावरुन 10x पर्यंत झूम करता येऊ शकतो.
वन प्लस 3 (किंमत 27999 रुपये): सध्या स्मार्टफोनमधील वन प्लस या स्मार्टफोनने धुमाकूळ घातला आहे. दिवसाच्या प्रकाशात चांगला फोटो कॅप्चर करत असल्याने, हा स्मार्टफोन ग्राहकांना आकर्षित करत आहे. ऑटो एचडीआर मोड आणि स्टील फोटो कॅप्चर करण्यात वन प्लस 3 हा फोन सर्वोत्कृष्ठ आहे.
आयफोन 7 (किंमत 60 ते 70,000 रुपये): अॅपलच्या 7 सिरीजमधील स्मार्टफोन ऑलराऊंडर काम करत असल्याने ग्राहकांच्याही विशेष पसंतीचे असतात. अॅपलचा आयफोन 7 या स्मार्टफोनची कलर क्वॉलिटीही सर्वोत्कृष्ठ असून, आयफोन 7 प्लसच्या तुलनेत याची कॅमेरा क्वॉलिटी कमी दर्जाची आहे. पण तरीही याच्या मदतीने चांगले फोटो क्लिक करु शकता.
एचटीसी 10 (किंमत 39,900 रुपये): स्मार्टफोनच्या जगतात इतर कंपन्यांच्या तुलनेत एचटीसीचे स्मार्टफोन महाग असल्याने ते प्रीमियम स्मार्टफोनच्या श्रेणीत येतात. एचटीसीच्या सर्वच स्मार्टफोनची कॅमेरा क्वॉलिटीही उत्कृष्ठ असते. एचटीसी 10 या स्मार्टफोनचा कॅमेराही एलजी G5 प्रमाणे दर्जेदार फोटो क्लिक करतो.
एलजी G5 (किंमत 52,990 रुपये): एलजीचा G5 हा स्मार्टफोन ग्राहकांच्या कमी पसंतीचा ठरला असला, तरी फोटो क्वॉलिटीच्या बाबतीत या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स चांगला आहे.
गूगलचा पिक्सेल XL (किंमत 67000): गूगलच्या पिक्सेल XL या स्मार्टफोनमधील कॅमेरा अॅपलप्रमाणेच सर्वोत्कृष्ठ आहे. उत्तम डीटेलिंग आणि आकर्षक अॅपमुळे तुम्ही काढलेले फोटो अधिक चांगल्या प्रकारे एडिट करु शकता. विशेष म्हणजे, याचा ऑटोफोकस अॅपलपेक्षा दर्जेदार आहे. तसेच व्हिडीओ क्वॉलिटीही सर्वोत्कृष्ठ असल्याने स्टील व्हिडीओसाठी गूगलचा हा स्मार्टफोन अतिशय उपयुक्त आहे.
अॅपल आयफोन 7 प्लस (किंमत 72000 रुपये): फोटो क्वॉलिटीच्या बाबतीत अॅपलचे कोणतेही स्मार्टफोन उत्कृष्ठ आहेत. कारण अॅपलच्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये कॅमेराचा यूजर इंटरफेस चांगला असल्याने, सुपर 4K व्हिडीओ आणि कमी प्रकाशातही चांगला फोटो काढता येऊ शकतात.
सॅमसंग गॅलेक्सी S7-Edge (किंमत 56,9000 रुपये): सॅमसंगच्या गॅलेक्सी S7-Edge या स्मार्टफोनमध्ये F-17 अपार्चर आणि ड्यूअल पिक्सल ऑटोफोकसचा कॅमेरा असून, कोणत्याही वातावरणात चांगला फोटो काढण्याची क्षमता या स्मार्टफोनमध्ये आहे. या स्मार्टफोनची किंमत 56,900 रुपये आहे.
सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात सर्वच स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या उत्पादानांमधील कॅमेराची क्वॉलिटी वाढवण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षभरात स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांनी उत्कृष्ट कॅमेरा क्वॉलिटीचे स्मार्टफोन बाजारात उतरवले. त्यामुळे एकंदरित फोटो शौकिनांची DSLR कॅमेराची गरज कमी झाली आहे. त्यातीलच काही निवडणक स्मार्टफोनची माहिती तुम्हाला देत आहोत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -