Zero Hour With Ramdas Athawale : महायुतीत किती जागा मिळणार? रामदास आठवले EXCLUSIVE
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी, हे आहे... महाराष्ट्र जागावाटपाचं आजचं चित्र... आता थोडं फ्लॅशबॅक सांगतो... महाराष्ट्र विधानसभेत २०१९ साली अपक्षांशिवाय १२५ पक्षांचे उमेदवार रिंगणात होते.. त्यापैकी १०२ पक्षांचे उमेदवार हे केवळ एक अंकी होते.. त्यामुळं एका मतदारसंघापुरताच पक्ष असूनही त्याचाही परिणाम निकालावर झाला. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं पुराण आम्ही आज का सांगतोय. तर त्याचं कारण आहे...महाराष्ट्रात २०१९ आणि २०२२ साली झालेले राजकीय भूकंप... आणि त्यानंतर तयार झालेल्या अनपेक्षित आघाड्या...
आज आपण एक गोष्ट स्पष्टपणे सांगू शकतो.. ती म्हणजे... महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी.. असाच सामना होणार आहे.. या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच आणि मॅरेथॉन बैठका सुुुरु आहेत. पण याच बैठकांमध्ये टेन्शन वाढवू शकतात. ते आहेत छोटे मित्रपक्ष.
आता हेच पाहाना. महाविकास आघाडी सत्तेत होती.. तेव्हा अनेक छोटे पक्ष त्यांच्यासोबत होते.. मग महायुती सत्तेत आली... तर अनेक छोट्या पक्षांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय केला. पण आता विधानसभा निवडणुकीची वेळ आलीय, तेव्हा बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष महायुतीतून बाहेर पडला. त्यांच्याशिवाय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), आरपीआय आठवले गट, जनसुराज्य शक्ती पक्ष, जनप्रहार पक्षानं आपापल्या पद्धतीनं जागांची मागणी केलीय.
तिकडे महाविकास आघाडीतही टिकून राहिलेल्या छोट्या मित्रपक्षांनी जागांची मागणी करायला सुरुवात केलीय. त्यातली काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आधी पाहूयात..
आणि आता याच संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आरपीआयच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
१) सगळ्यांच्या मनातला प्रश्न... रामदास आठवलेंना महायुतीत किती मिळणार?
२) लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपात तुम्ही एक पाऊल मागे घेऊन महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या बदल्यात आता किती जागांवर तडजोड करणार?
३) तुम्हाला लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पुन्हा उपेक्षित राहावं लागलं तर काय भूमिका घेणार?
४) जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष ३६ ते ४० जागा मागतोय. त्या नाही मिळाल्या तर २८८ लढवणार अशी घोषणा त्यांनी काल केलीय. पीपल्स रिपब्लिकन पक्ष कवाडे गटानं १५, तर विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षानं १२ ते १५ जागांची मागणी केलीय. ही मागणी मान्य होईल असं वाटतं का?
५) अजित पवार महायुतीत आल्यामुळं छोट्या मित्रपक्षांच्या पदरी मोठी निराशा आली का? आणि आता विधानसभेच्या जागावाटपात त्याचा परिणाम भोगावा लागतोय का?